थिबा पॉईंट
रत्नागिरी जिल्हा भारत देशातील महाराष्ट्र राज्याच्या 36 जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. रत्नागिरी येथे अनेक पर्यटन स्थळे आहेत. पर्यटन दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असा जिल्हा. रत्नदुर्ग, थिबा राजवाडा, समुद्रकिनारे, गणपतीपुळे, पावस, इत्यादी. अशा प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक म्हणजे थिबा पॉईंट. थिबा पॅलेस परिसरात आकाशवाणी केंद्राला लागून असलेलेले स्थान 'थिबा पॉईंट' नावाने ओळखले जाते. या स्थानाजवळच जिजामाता राजमाता उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. या उद्यानातील टॉवरवरून भाट्ये खाडी आणि राजवाडी बंदराचे नयनरम्य दृष्य दिसते. अथांग सागराच्या पार्श्वभूमीवर दिसणारे सुर्यास्ताचे विहंगम दृष्य नजरेत साठविण्यासाठी सायंकाळी या उद्यानात पर्यटकांची गर्दी होते. उद्यानात लहानमुलांच्या मनोरंजनाची अनेक साधने आहेत.

कालांतराने म्हणजेच राजाचा मृत्यू नंतर काही काळाने हि जमीन नगरपरिषदेने आपल्या ताब्यात घेतली. व त्याचे रूपांतर उद्यानामध्ये २००६ साली करण्यात आले. तसेच त्या आसपासचा परिसराचा विकास करण्यात आला. २००६ साली कोकण बॅंकेच्या विशेष निधी योजनेतून ह्या थिबा पॉईंटचे रूपांतर एक उद्यानात करण्यात आले. व ह्या उद्यानाला राजमाता जिजामाता उद्यान असे नाव देण्यात आले.
उद्यानात रूपांतर झाल्याने हे ठिकाण पर्यटकांचे आकर्षण बनले. येथे अनेक
लहान मुलांसाठी मनोरंजक खेळणी करण्यात
आली आहेत. तसेच सूर्यास्त पाहण्यास लोकांची गर्दी होऊ लागली. उद्यानातील टॉवरवरून
दिसणारे दृश्य नयनरम्य असे आहे. टॉवरवरून रत्नागिरीतील अनेक ठिकाणांवर ओझरती नजर
टाकणे सहज शक्य आहे.
रत्नागिरी नगरपालिकेने २००८ मध्ये ह्या उद्यानात अनेक बदल केले आहेत. पर्यटकांसाठी विविध फूड स्टॉल करण्यात आले आहेत. उद्यानात कृत्रिम असे कारंजे तयार करण्यात आले आहेत. रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी ते चालू केले जातात. तसेच लहानमुलांकरीता पाण्यातील काही खेळ उपलब्ध करण्यात आले आहेत.अनेक प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत, त्यामुळे ह्या जागेचे शोभा वाढते आहे. असा हा थिबा पॉईंट पर्यटकांचा मनाला स्फुर्ती देणारा आहे. अशा ह्या पर्यटन स्थळी एकदातरी अवश्य भेट द्या.